विभागीय आयुक्त कार्यालयात जयंती.JPG

औरंगाबाद,दि.3(जिमाका) — क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त  विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी  अपर आयुक्त डॉ. शिवानंद टाकसाळे, डॉ. विजयकुमार फड, उपायुक्त वर्षा ठाकुर, महेंद्र हरपाळकर, सरिता सुत्रावे यांची उपस्थिती होती. त्यांनीही प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*******