यावर्षी आतापर्यंत चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी आनंदी झाला आहे. एकूण आजपर्यंत 675.46 वार्षि सरासरीच्या 422.65 मि.मी. पाऊस झाला असून  त्याची वार्षि टक्केवार 62.57 टक्के एवढी आहे. वेळेवर पाऊस झाल्याने खरीप हंगामात 25 ऑगस्ट अखेर 7,21985 हेक्टरवर पेरणी झाली आहे. ती सरासरीच्या  102.62 टक्के आहे. यामध्ये मका 1,86928 हेक्टर, तूर 52756 हेक्टर, कापूस 3,81242 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली तर बाजरी 66.20 टक्के, मूग 392.31 टक्के, उळीद 367.09 टक्के तर सोयाबिन 194.76 टक्के इतकी पेरणी झाली आहे. मूग पिक काढणीत आहे तर सोयाबीन पिकास शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. कापसास पाते फुले लागत आहेत. डी पीक पुढील आठवडया काढणीस येईल.बाजरी पिकास कणसे भरण्यास सुरुवात झाली आहे. तूर पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

        जिल्हयात 10 ते 12 ऑगस्ट पासून जवळपास सर्वच ठिकाणी पावसाचा खंड पडला होता. हलक्या जमीनीवरील पिके ऊन धरत आहेत. पाऊ पडल्यास 20 ते 25 टक्के उत्पादनात घट येवू शकते तथापि 31 ऑगस्ट 1 सप्टेंबरला पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. मका, कापूस, सोयाबीन पिकावर झालेल्या किड रोगाचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांना संदेश देण्यात आला आहे.

        पुरेसा पाऊस झाल्यामुळे तसेच जलयुक्त शिवार अभियानातील कामामुळे 1 सप्टेंबर 2016 रोजी जिल्हयात कुठेही टॅंकरद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा सुरु नाही. गरज पडल्यास तालुकानिहाय टँकर भरण्याच्या कामाचे ठिकाण निश्चि करण्यात आल आहेत. पाणी टंचाई निवारण्यासाठी सन 2016-17 या वर्षासाठी 18 कोटी 57 लाख 44 हजार एवढा निधी प्राप्त झाला आहे. यासाठी एकूण आवश्यक निधी 42 कोटी 54 लाख 97 हजार पाहीजे आहे.

        पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत 2 लाख 21 हजार 782 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. सन 2016-17 वर्षातील खरिप हंगामात शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटपाचे बँकनिहाय लक्षांक ठरवून दिलेले आहे. त्यानुसार 25 ऑगस्ट अखेर 1 लाख 80 हजार 397 शेतकऱ्यांना 789 कोटी 43 लक्ष 32 हजार एवढे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्याची टक्केवारी 117.40 एवढी आहे.  खरीप हंगाम 2015 मधील पिक कर्जाच्या पुर्नगठणाअंतर्गत 7947 पुर्नगठीत शेतकऱ्यांना 69 कोटी 27 लक्ष 66 हजार रुपये पिक कर्ज वाटप केले आहे.

        जिल्हयात 2 3 ऑगसट रोजी गोदावरी नदीला पुर परिस्थती निर्माण झाली, त्यामुळे गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील 2490 शेतकऱ्यांचे 1850 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले. प्रती हेक्टरी 6800 रु. प्रमाणे 12 कोटी 5 लाख 74 हजार 900 रु. नुकसान भरपाई पोटी निधी अपेक्षित आहे. तसेच वैजापूर तालुक्याती 185 बागायती शेतकऱ्यांचे जवळपास 98 हेक्टर बागायती क्षेत्र बाधीत झाले. या बागायती बाधीत प्रती हेक्टरी क्षेत्राला 13500  रु. प्रमाणे 1 कोटी 3 लक्ष 12 हजार 335 रु.   निधी अपेक्षित आहे. तसेच वैजापूर तालुक्यातील 3 शेतकऱ्यांचे या पुरामुळे फळपिकांचे नुकसान झाले त्यासाठी प्रती हेक्टरी 18000 प्रमाणे 39 हजार 600 रु निधी अपेक्षित आहे. या दोन दिवसाच्या पुरामुळे सर्व मिळून एकूण 2678 शेतकऱ्यांचे जवळपास 1949 हेक्टर क्षेत्र  बाधीत झाले त्यासाठी 13 कोटी 9 लाख 26 हजार 835 रु. नुकसान भरपाई अपेक्षित आहे.मागील वर्षी 17 18 सप्टेंबर या दोन दिवशी अतिवृष्टी झाल्याने एकूण 7322 शेतकऱ्यांचे 2316 हेक्टर क्षेत्र बाधीतझाले. त्यासाठी 16 कोटी 66 लक्ष 9319 रु. नुकसान भरपाई अपेक्षित आहे. या दोन दिवसाच्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड सोयगाव तालुक्यातील 287 हेक्टर शेतजमीन खरडून गेली. त्यासाठी देय निधी 10 कोटी 76 लाख 6 हजार25 रु. अपेक्षित आहे. सन 2015 मध्ये शेतकऱ्यांना 191.91 कोटी खरीप अनुदान वाटप करण्यात आले.

        1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2016 पर्यंत शेतकरी आत्महत्याच्या 100 प्रकरणांपैकी 67 पात्र शेतकऱ्यांच्या वारसांना 67 लक्ष रु. मदत वाटप करण्यात आली आहे.

जिल्हयात जलयुक्त शिवार अभियान गेल्या दोन वर्षापासून उत्तरित्या राबविण्यात येत आहे.सन 2015-16 मध्ये 228 गावे निवडण्यात आल होती, त्यात 7611 कामे प्रस्तावित होती, त्यापैकी 7057 कामे हाती घेण्यात आली आतापर्यंत त्यातील 6092 कामे पूर्ण करण्यात आली. 965 कामे प्रगतीपथावर आहेत यासर्व कामावर 63 कोटी 53 लाख रु खर्च झाले आहेत. या 228 गावांपैकी 169 गावात 100 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तर 50 टक्के कामे पूर्ण झालेली 69 गावे आहेत. 385 गाळ काढण्याच्या कामासाठी 17 कोटी 93 लाख खर्च करुन 55 लाख घनमीटर गाळ उपसण्यात आला.  जलयुक्त अभियानामुळे 42216 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला.

सन 2016-17 साठी जलयुक्त शिवार अभियानामध्ये 223 नविन गावे निवडण्यात आली आहेत. त्याचा प्रकल्प आराखडा 204 कोटी रु. खर्चाचा आहे. आतापर्यंत 24 कोटी 82 लाख रु. निधी प्राप्त झाला आहे. 107 गावांत कामे सुरु झाली आहेत. 97 कामे पूर्ण झाली आहेत. गाळ काढण्याची एकूण कामे 137 आहेत. मागेल त्याला शेततळे या उपक्रमांत 2417 लक्षांक असून 9318 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 9296 शेतकरी पात्र आहेत. 2417 शेततळे कामांना कार्यरंभ आदेश देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना जिल्हयात सुरु झाली आहे.सन 2015-16 मध्ये 64 कि.मी. सन 2016-17 साठी 166 कि.मी. द्दिष्ट निश्चित आहे. हे द्दिष्ट तालुकानिहाय वाटप करण्यात आले आहेशासनाने ठरवून दिलेल्या द्दिष्टानुसार प्रत्येक तालुक्याच्या कोअर नेटवर्क मधील ठरवून दिलेल्या गुणांकाप्रमाणे प्राधान्य यादी तयार करण्यात आली आहे. या यादीस  मंजूर मिळताच अंदाजपत्रके तयार करुन पुढील कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे.

धरणाची स्थिती पाहता जिल्हयात जायकवाडी हा प्रकल्प मोठा आहे. त्यामध्ये आज घडीला 1425.46 ...मी. म्हणजे 65.66 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्हयात 16 मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये 8.99 टक्के उपयुक्त साठा आहे. तसेच 90 लघु प्रकल्प असून त्यामध्ये 27 टक्के उपयुक्त पणीसाठा आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2016-17 चा मंजूर नियतव्ययरु. 260.05 कोटी असून सदरील निधी प्राप्त झालेला आहे. माहे ऑगस्ट अखेर रु. 10.66 कोटी च्या कामांना  प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या असून रु. 39.21 कोटी रु. निधी संबंधित कार्यवाही यंत्रणेना वितरीत करण्यात आलेला आहे. वितरीत केलेल्या निधी पैकी कार्यवाही यंत्रणांनी 18.28 कोटी रु. निधी खर्च केलेला आहे.

आमदार आदर्श ग्राम योजने अंतर्गत जिल्हयातील सर्व 11 माननीय विधानमंडळ सदस्यांनी सन 2016-17 वर्षाकरीता 11 गावांची निवड केली आहे. सर्व गावांना प्रभारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेतया 11 गावांना 319 कामांना मान्यता मिळालेली असल्याने ती आराखड्यात प्रस्तावित आहेत. त्यापैकी 15 कामांना तांत्रिक मान्यता आणि78 कामांना प्रशासकीय मान्यता 14 कामांना वित्तीय मान्यता मिळाली असून 12 कामे सुरु झाली आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण विकासाने आघाडी घेतली असून अधिकारी, पदाधिकारी एकवटून कामाला लागले आहेत.

        रामचंद्र देठे,

     जिल्हा माहिती अधिकारी,

           औरंगाबाद

 ******