जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती.jpg

औरंगाबाद,दि.3(जिमाका) — क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी  उपजिल्हाधिकारी श्रीमती रिता मेत्रेवार, तहसिलदार राजू शिंदे  यांची उपस्थिती होती. त्यांनीही प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*******