औरंगाबाद,दि. 06 (जिमाका) – जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील  औरंगाबाद दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शनिवार, 7 मार्च रोजी सकाळी 7.25 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7.45 वा. सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वा. ते 12.30 वाजता एन 11 मधील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, कार्यकर्ता चर्चा. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जालना रोडवरील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ येथे आढावा बैठक. दुपारी 3.30 ते 4.30 पैठण रोडवरील वाल्मी संस्थेस भेट. सायं. 5 ते 7 वाजेपर्यंत एमजीएम येथे खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धा समारोप पारितोषिक वितरण समारंभास उपस्थिती. रात्री 8.20 वा. विमानाने औरंगाबादहून मुंबईकडे प्रयाण.

******